
Bird flu outbreak in eastern Maharashtra | पूर्व महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यू चा शिरकाव , पशुसंवर्धन विभाग आता उपाययोजनेसाठी ॲक्शन मोड मध्ये

Bird flu outbreak in Maharashtra|पूर्व महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यू चा शिरकाव :
मराठवाड्यात बर्ड फ्लूचा परिणाम झाला आहे आणि त्याचे लक्षणं देखील लोकांमध्ये दिसून येत आहे. मराठवाड्यातील लातूर नंतर आता नांदेड जिल्ह्यात देखील बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला आहे . लोहा तालुक्यातील किवळा येथील मृत कुकुट पक्षांचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने प्रशासन सतर्क झाले असून पशुसंवर्धन विभागाकडून उपयाजोजना सुरू करण्यात आल्या आहेत . या दरम्यान नांदेडमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने नांदेड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
संबंधित पुरावे व अंमलबजावणी
लोह तालुक्यातील कीवळा येथील शेतकरी पंजाब टरके यांच्या मोकळ्या कूकुट पालन केंद्रातील कोंबड्यांचे 20 पिल्ले संक्रमित होऊन मृत अवस्थेत आधळले होते . पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत मृत कुकुट पक्ष्यांचे नमुने पुणे आणि भोपाळ येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात आले . त्याचा अहवाल आज मिळाला असून त्या अहवालात मृत पिल्यांचे नमुने हे पोझीटीव्ह आले आहेत.
मृत कुकुट पक्ष्यांना बर्ड फ्लुची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे . त्यामुळे कीवळा येथील दहा किलोमिटर परिसरात अलर्ट झोन घोषित करण्यात आले आहे . दरम्यान तातडीने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून 565 कुकट
पशुसंवर्धन विभागाने ताब्यात घेऊन त्यांची विल्हेवाट लावली आहे.
प्रशासनाकडून उपाययोजना
आजूबाजूच्या परिसरात बर्ड फ्लूचा प्रसार होऊ नये म्हणून , यासाठी कीवळा येथील दहा किलोमिटर क्षेत्रात अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे . या परिसरात कुकुट पक्ष्यांची खरेदी -विक्रीची दुकाने,अंडी , किकुट मांसाची चिकन दुकाने,वाहतूक ,बाजार आणि यात्रा बंद राहणार अस स्पष्ट करण्यात आले आहे. बर्ड फ्ल्यू रोगाबाबत अनावश्यक भीती बाळगू नये . आणि अफवा वरती विश्वास ठेव् नये असे प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे . आणि या आजाराबाबत परिसरात गैरसमज पसरवू नये असे ही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे . दरम्यान जिल्ह्यात कुठेही या रोगाबबत लक्षणं आढळले की त्वरित जवळील पशू वैद्यकीय रुग्णालयात संपर्क साधण्याचे आवाहन पशुसंवर्धन अधिकारी राजकुमार पडिले यांनी केले आहे.