RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32438 जागांसाठी मेगा भरती

RRB Group D Bharti 2025

RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32438 जागांसाठी मेगा भरती

 

RRB Group D Bharti 2025
RRB Group D Bharti 2025

 

RRB Group D Bharti 2025. Railway Group D Bharti 2025:

भारत सरकार ,रेल्वे मंत्रालया च्या वतीने ,रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) द्वारे भारतीय रेल्वेत  ग्रुप -D भरती प्रक्रियेचे व्यवस्थापन भारतीय रेल्वे भरती बोर्ड द्वारे करण्यात आले आहे , ज्याचा उपयोग भारतीय रेल्वेमध्ये विविध भूमिका भरण्यासाठी केला जातो, या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवून घेण्याची मोठी संधी आहे . तरी इच्छुक उमेदवारांनी सर्व भरती प्रक्रिया व सविस्तर संबंधित जाहिरात वाचून या पदांसाठी अर्ज करावा .

संबंधित अधिक माहिती पाहण्यासाठी खाली माहिती उपलब्ध आहे ….

What is group D in Indian Railways? |भारतीय रेल्वेमध्ये गट डी म्हणजे काय?

भारतीय रेल्वेत ग्रुप D ही सर्वात निम्न श्रेणीतील नोकरी श्रेणी आहे. या पदांमध्ये मुख्यत-अतांत्रिक (Non-Technical) कामे असतात आणि त्यामध्ये हाताने काम करणे, देखभाल-दुरुस्ती आणि सहाय्यक प्रकारची जबाबदारी असते. रेल्वेच्या सुरळीत व्यवस्थापनासाठी या कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते.

पदाचे नाव  Job Title
ट्रॅक मेंटेनर (गंगमॅन) Track Maintainer (Gangman)
हेल्पर (इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिग्नल & टेलिकॉम) Helper (Electrical, Mechanical, Signal & Telecom)
असिस्टंट पॉईंट्समन Assistant Pointsman
पोर्टर (हमाल) Porter (Hamal)
स्वच्छता कर्मचारी (सफाईवाला) Sanitation Worker (Safaiwala)
शिपाई (Peon) Peon
हॉस्पिटल अटेंडंट (रुग्णालयातील मदतनीस) Hospital Attendant

 

RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32438 जागांसाठी मेगा भरती

 

जाहिरात क्रमांक : CEN No.08/2024

 

पदाचे नाव & तपशील:

पदाचे नाव पद संख्या
ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅक मेंटेनर) 32,438
TOTAL 32,438

 

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण किंवा ITI

वयाची अट: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹500/-(SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-)

 

महत्त्वाच्या तारखा:

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2025

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

 

महत्वाच्या लिंक्स : 

विवरण लिंक
जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here

 

Ranveer Allabhbadia vulgar comment on Parents’ Sexual relationship | रणवीर अल्लाबदिया याचे आई वडिलांच्या च्या शारीरक संबंधा विषयी अश्लील विधान ? जाणून घ्या सविस्तर

Ranveer Allabhbadia vulgar comment on Parents’ Sexual relationship

रणवीर अल्लाबदिया याचे आई वडिलांच्या च्या शारीरक संबंधा विषयी अश्लील विधान ? जाणून घ्या सविस्तर | Ranveer Allabhbadia vulgar comment on Parents’ Sexual relationship

Ranveer Allabhbadia vulgar comment on Parents’ Sexual relationship
Ranveer Allabhbadia vulgar comment on Parents’ Sexual relationship

Indias Got Latent |Ranveer Allabhbadia vulgar comment ,यूट्यूबर रणवीर अलाहबादियाने पालकांबद्दल आक्षेपार्ह प्रश्न विचारल्यामुळे नवा वाद निर्माण झाला असून त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

 “Ranveer Allabadia’s obscene statement about parents’ physical relationship| रणवीर अल्लाबदिया याचे आई वडिलांच्या च्या शारीरक संबंधा विषयी अश्लील विधान “

कॉमेडियन समय रैना याचा शो ‘इंडियाज गॉट लेटेंट’ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या शोमध्ये युट्युबर रणवीर अलाहबादिया याने विचारलेल्या प्रश्नावरुन वाद निर्माण झाला आहे. रणवीर अलाहबादिया याने स्पर्धकाला पालकांबद्दल आर्क्षेपार्ह प्रश्न विचारला, यानंचर सोशल मीडियावर एकच खळबळ माजली आहे. रणवीरने स्पर्धकाला विचारलं होतं की, कुणालाच्या पालकांना दररोज इंटिमेट होताना पाहायला आवडेल की, त्यांना साथ द्यायला आवडेल. रणवीरच्या या प्रश्नावरुन मोठी कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण झाली आहे. रणवीरचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्याच्यावर निशाणा साधण्यासा सुरुवात केली आहे.

रणवीर अलाहाबादिच्या फालतू प्रश्नावर नेटकरी भडकले
समय रैनाचा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा शो नेहमीच चर्चेत असतो. शो सुरु झाल्यापासून आतापर्यंत अनेक वादही निर्माण झाले आहेत. आता पुन्हा एकदा यामुळे नवा वाद उफाळून आला आहे. यूट्यूबर आशिष चंचलानी, अपूर्वा मुखिजा आणि रणवीर अलाहबादिया यासारखे सेलिब्रिटी शोच्या नवीन भागांमध्ये सामील झाले होते. या भागात रणवीर अलाहबादियाने एक प्रश्न विचारला, ज्यासाठी त्याला सोशल मीडियावर युजर्सनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

Parent’s sex life subject of joke? |पालकांचं लैंगिक आयुष्य विनोदाचा विषय?

सध्या विनोद फक्त अश्लीलतेबाबत मर्यादित आहे का, असाही प्रश्न उपस्थित झाले आहेत. फक्त प्रेक्षकांचे मनोरंजन करणे आणि व्ह्यूज मिळवणे हे ध्येय आहे की, काही नैतिक मर्यादा देखील असायला हव्यात? या वादामुळे भारतात कंटेंट क्रिएटर्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची जबाबदारी कुठे आहे याबद्दल पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

India’s Got Latent and Controversy|इंडियाज गॉट लेटेंट आणि वाद

‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा कॉमेडियन समय रैनाचा शो अनेकदा वादात सापडला आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणला ट्रोल करणं, अरुणाचल प्रदेशातील लोकांबद्दल विनोद अशा अनेक कारणांमुळे हा शो चर्चेत आला आहे. हा शो कॉमेडीच्या नावाखाली अश्लीलता वाढवत असल्याचं म्हणत आता नेटकऱ्यांनी यावर निशाणा साधला आहे. हा शो वल्गर टीप्पणी करत प्रसिद्धी मिळत असल्याचंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. पालकांचं लैंगिक आयुष्य कॉमेडीचा विषय कसा असू शकतो, असा सवालही नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. ‘बिअर बायसेप्स’ यूट्यूबर रणवीर अलाहबादियाच्या वक्तव्यावरुनही नेटकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे.

Reactions of netizens and other actors on the controversial issue|नेटकऱ्यांच्या व इतर अभिनेत्यांच्या यावर वादग्रस्त मुद्द्यावर प्रतिक्रिया :

रणवीर अलाहाबादियाच्या वादग्रस्त विधानामुळे अनेक सेलिब्रेटींचा शोमध्ये येण्यास नकार, सर्वात आधी या कलाकाराने फिरवली पाठ
मुंबई- सध्या रणवीर अलाहबादिया हा युट्युबर सध्या चांगलाच वादात सापडला आहे. इंडिया गॉट लेटेंट या शोमध्ये त्याने आईवडिलांवरुन आक्षेपार्ह विधान केले. त्यावरुन त्याच्यावर बरीच टीका होत आहे. सध्या त्याचे करिअर धोक्यात आल्याचे पाहायला मिळते. रणवीर मोठमोठ्या सेलिब्रेटींना त्याच्या शोमध्ये बोलवतो. पण आता त्याच्या एका चुकीमुळे बऱ्याच सेलिब्रेटींनी त्याच्या शोमध्ये येण्यास नकार दिला आहे.

ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांनी नुकतेच समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया यांच्या एका वादग्रस्त व्हिडिओवर आपले मत मांडले आहे. आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले की, ज्यांना या प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार आहे त्यांनी निश्चितच तसे करावे. पूर्वी, अश्लील कंटेंट ओटीटीचा भाग होता आणि आता तो अशा कॉमेडी शोपर्यंतही पोहोचला आहे, अन्नू कपूर पुढे म्हणाले, “ओटीटीमध्ये काम करणारे लोक तेच लोक आहेत जे टेलिव्हिजनमध्ये प्रतिबंधित होते. त्यांना प्रेक्षकांना काय हवे आहे हे चांगले माहिती आहे. जर तुम्हाला अश्लीलता हवी असेल तर ते तुम्हाला ती देण्यासाठी तयार आहेत. हे सर्व मागणी आणि पुरवठ्याबद्दल आहे. असे एक टक्काही लोक नसतील ज्यांना असा कंटेंट आवडत नाही.”
याशिवाय, गायक बी प्राकनेही रणवीरसोबतचा त्याचा पॉडकास्ट रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये त्याने आपला निर्णय स्पष्ट सांगितला. बी प्राकने खुलासा केला, “रणवीर, तू सनातन धर्माचा प्रचार करतोस, तू अध्यात्माबद्दल बोलतोस, तुझ्या शोमध्ये मोठमोठी नावे येतात आणि तुझी ही मानसिकता? मी तुम्हा सर्वांना विनंती करतो. जर आपण हे आता थांबवले नाही तर आपल्या मुलांचे भविष्य धोक्यात आहे.”
याआधी विनोदी कलाकार सुनील पाल यांनीही समय रैना आणि रणवीरवर टीका केली होती. आयएएनएसशी बोलताना सुनील पाल म्हणाले, “त्यांना स्टँड-अप कॉमेडियन म्हणू नका. असे करणे खऱ्या स्टँड-अप कॉमेडीचा अपमान होईल. ते अशिक्षित लोक आहेत त्यांना दहशतवाद्यांशी वागवले पाहिजे.”
तो म्हणाला, “आपले तरुण प्रतिष्ठित कुटुंबातील जबाबदार आणि सुसंस्कृत व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण, या तथाकथित विनोदी कलाकारांना सार्वजनिक व्यासपीठांवर आमंत्रित केले जाते जिथे ते अश्लीलता आणि आक्षेपार्ह भाषा वापरतात आणि त्याची विडंबना अशी की या कार्यक्रमांचे आयोजक सुशिक्षित लोक असतात. तेही अश्लीलतेला प्रोत्साहन देत आहेत.”

Reaction of Chief Minister Devendra Fadnavis|मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

रणवीर अलाहाबादियाच्या प्रश्नामुळे भारताची सर्जनशील अर्थव्यवस्था कोणत्या दिशेने जात आहे, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “फ्रीडम ऑफ स्पीच सगळ्यांनाच आहे. एखाद्याला दुखावण्यात कुठलंही स्वातंत्र्य नाही, मात्र अभिव्यक्तीलाही काही मर्यादा आहेत. आपण समाजात अश्लीलतेचे काही नियम लावले आहेत.”

Who is Ranveer Allabadia and how much is his net worth? |कोण आहे रणवीर अल्लाबदिया आणि किती आहे त्याची संप्पत्ती ?

प्रसिद्ध युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर इलाहाबादिया त्याच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आला आहे. रणवीर इलाहाबादिया समय रैनाच्या इंडियाज गॉट टॅलेंट शोमध्ये सामील झाला. त्यावेळी त्यानं एका स्पर्धकाला एक प्रश्न विचारला. या प्रश्नामुळं सोशल मीडियावर रणवीरवर बरीच टीका होत आहे. रणवीर इलाहाबादियाला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. रणवीर इलाहाबादियाने बॉलिवूड, हॉलिवूड स्टार, ज्योतिषी इत्यादी विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. रणवीर नेहमीच त्याच्या पॉडकास्ट, स्टायलिश लूक आणि फिटनेसमुळे चर्चेत असतो. चला जाणून घेऊया कोण आहे रणवीर इलाहाबादिया, त्याची जीवनशैली, करिअर आणि एकूण संपत्ती. णवीर इलाहाबादियाचा जन्म 2 जून 1993 रोजी मुंबईत झाला. त्याने मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतले. 2015 मध्ये द्वारकादास जीवनलाल संघवी अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये बी.टेक पूर्ण केले. रणवीर हा बियरबायसेप्स या नावानेही प्रसिद्ध आहे. वयाच्या 22 व्या वर्षी कारकिर्दीला सुरुवात करून त्याने YouTuber आणि पॉडकास्टर म्हणून स्वतःचे नाव कमावले. तो मोंक एंटरटेनमेंटचा सह-संस्थापक देखील आहे. इलाहाबादिया सात यूट्यूब चॅनेल चालवतो. या चॅनलचे 1.2 कोटींहून अधिक सबस्क्राइबर आहेत.

रिपोर्ट्सनुसार रणवीर इलाहाबादिया यूट्यूब आणि पॉडकास्टमधून दरमहा सुमारे 35 लाख रुपये कमावतो. त्याच्याकडे उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत ज्यात YouTube जाहिराती, रॉयल्टी, ब्रँड प्रायोजकत्व यांचा समावेश आहे. याशिवाय रणवीर ब्रँड प्रमोशन आणि जाहिरातींमधूनही भरपूर कमाई करतो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार 2024 पर्यंत रणवीर इलाहाबादियाची एकूण संपत्ती अंदाजे 60 कोटी रुपये आहे. त्याच्याकडे फक्त एकच कार आहे, स्कोडा कोडियाक, ज्याची किंमत सुमारे 34 लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.

‘आप सिख हैं..ये शोभा देता है आपको?’

सिंगर बी प्राक ने साधा कॉमेडियन महीप सिंह पर निशाना.#bpraak#maheepsingh#indiasgottalent pic.twitter.com/pps2cC5CZf

— NDTV India (@ndtvindia) February 10, 2025

 

“अधिक माहिती पहा”

 

अधिक वाचा: https://aaplisatta.com/who-will-be-the-next-prime-minister-of-india/

 

धन्यवाद वाचक मित्रानो आपली सत्ता ला भेट दिल्या बद्धल , अश्याच नवं – नवीन बातम्या पाहण्यासाठी आणि वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आपली सत्ता ला SUBSCRIBE करा आणि आमच्या शी जोडलेले राहा .

धन्यवाद…

मोदींनंतर कोण ? कोण होणार भारताचे पुढचे पंतप्रधान मंत्री |After Modi? Who will be the next Prime Minister of India?

मोदींनंतर कोण ? कोण होणार भारताचे पुढचे पंतप्रधान मंत्री|After Modi Who will be the next Prime Minister of India?

 

 

Who will be the next Prime Minister of India
Who will be the next Prime Minister of India

 

जानेवारी २०२५ च्या राष्ट्रीय सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतरच्या शर्यतीत गृहमंत्री अमित शाह आघाडीवर आहेत. 25% प्रतिसादकर्त्यांसह शाह आघाडीवर आहेत, तर शिवराज सिंह चौहान यांना संभाव्य उत्तराधिकारी म्हणून लोकप्रियता मिळाली आहे.

 

“मोदींनंतर कोण?”– या प्रश्नाने साहजिकच भाजप समर्थकांना बराच काळ धारेवर धरले आहे. 10 वर्षांहून अधिक काळ देशाचे नेतृत्व केल्यामुळे आणि त्यांचा तिसरा कार्यकाळ संपण्यापूर्वी त्यांचा 75 वा वाढदिवस जवळ आल्याने, नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधानपदाच्या उमेदवारासाठी भाजपच्या पर्यायांबद्दल लोक विचार करत असणे स्वाभाविक आहे. इंडिया टुडे मूड ऑफ द नेशन सर्व्हेची ऑगस्ट 2024 आवृत्ती आम्हांला मोदींच्या उत्तराधिकाऱ्यांसाठी कोणाला सर्वोत्तम वाटेल याकडे डोकावून पाहते.
आपली सत्ता ग्रुपच्या द्वि-वार्षिक फ्लॅगशिप सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की 25% पेक्षा जास्त पाठिंबा देऊन अमित शहा हे योगी आदित्यनाथ आणि नितीन गडकरी यांसारख्या भाजपच्या इतर वरिष्ठ नेत्यांच्या तुलनेत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पंतप्रधान मोदींच्या उत्तरार्धात सर्वोच्च निवड म्हणून पाहिले जात आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुमारे 19% सह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. जानेवारी २०२५ च्या आपली सत्ता ग्रुपच्या नेशन सर्व्हेने सुचवले आहे की, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे 13% मतांसह भगव्या पक्षातील सर्वोच्च स्थानासाठी तिसरे सर्वात अनुकूल व्यक्ती आहेत.

 

Who will be the next Prime Minister of India
Who will be the next Prime Minister of India

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्या बाजूने जवळपास 5% मते घेतली.आपली सत्ता ग्रुपच्या नेशन सर्व्हेने द्वि-वार्षिक सर्वेक्षणात अमित शहा आघाडीवर असले तरी, त्यांचे 25% मान्यता रेटिंग एप्रिल 2024 आणि सप्टेंबर 2023 मधील मागील सर्वेक्षणांपेक्षा घसरले आहे.
गेल्या दोन सर्वेक्षणांमध्ये, 28% आणि 29% लोकांनी पीएम मोदींच्या उत्तरार्धात भाजप नेत्यांमध्ये अमित शाह यांची निवड केली होती.
आपली सत्ता ग्रुपच्या नेशन सर्व्हेच्या जानेवारी २०२५ च्या आवृत्तीत असेही दिसून आले आहे की दक्षिण भारतातील ३१% पेक्षा जास्त उत्तरदात्यांचा असा विश्वास आहे की पंतप्रधानपदासाठी भाजपचे उमेदवार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शाह हे सर्वोत्तम उमेदवार आहेत.

 

 

देशव्यापी 25% समर्थनाच्या तुलनेत, दक्षिण भारतात अमित शाह यांचे 31% मान्यता रेटिंग सर्व क्षेत्रांमध्ये सर्वोच्च आहे.
शाह यांच्याप्रमाणेच योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान मोदींच्या पाठीशी उभे राहण्याचे प्रमाणही घसरले आहे. योगी आदित्यनाथ यांचा पाठिंबा ऑगस्ट 2023 मधील 25% वरून फेब्रुवारी 2024 मध्ये 24% वर घसरला, सर्वेक्षण प्रतिसादकर्त्यांपैकी फक्त 19% लोक आता त्यांना भाजपमध्ये पंतप्रधान मोदींचे योग्य उत्तराधिकारी म्हणून पाहतात.

 

सुमारे 13% प्रतिसादकर्त्यांनी नितीन गडकरी यांना संभाव्य पर्याय म्हणून निवडले,अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्या रेटिंगमध्ये घसरण झाल्याने साहजिकच हा प्रश्न निर्माण होतो: लाभ घेणारे कोण आहेत?
आपली सत्ता ग्रुपच्या नेशन सर्व्हेच्या सूचित करतो की राजनाथ सिंह आणि शिवराज सिंह चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संभाव्य उत्तराधिकारी म्हणून लोकप्रियता मिळवली आहे.

 

 

राजनाथ सिंह यांनी ऑगस्ट 2024 पासून सुमारे 1.2 टक्के गुण मिळवले आहेत, तर माजी खासदार सीएम शिवराज सिंह चौहान यांनी लक्षणीय झेप घेतली आहे, जी ऑगस्ट 2023 मधील 2.9% वरून 5.4% पर्यंत वाढली आहे.
पीएम मोदींचे पसंतीचे उत्तराधिकारी म्हणून चौहान यांचा उदय नवी दिल्लीत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यामुळे होतो. जून 2024 मध्ये मोदी 3.0 कॅबिनेटमध्ये सामील झाल्यानंतर, भाजपचे पंतप्रधान उमेदवार म्हणून त्यांची लोकप्रियता वाढली आहे.

 

“अधिक माहिती पहा”

 

अधिक वाचा : https://aaplisatta.com/jsw-group-new-investment-plan-in-maharashtra/

 

 

धन्यवाद वाचक मित्रानो आपली सत्ता ला भेट दिल्या बद्धल , अश्याच नवं – नवीन बातम्या पाहण्यासाठी आणि वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आपली सत्ता ला SUBSCRIBE करा आणि आमच्या शी जोडलेले राहा .

धन्यवाद…

सावधान एकटेपणा हे नवीन धूम्रपान आहे दिवसाला १५ सिगारेटइतकाच हानिकारक |LONELINESS IS THE NEW SMOKING: AS HARMFUL AS 15 CIGARETTES A DAY!

Loneliness

सावधान एकटेपणा हे नवीन धूम्रपान आहे दिवसाला १५ सिगारेटइतकाच हानिकारक |LONELINESS IS THE NEW SMOKING: AS HARMFUL AS 15 CIGARETTES A DAY!

ही बातमी अलिकडच्या झालेल्या संशोधनां मधून मिळाली आहे या संशोधना मधे एकटेपणा हा केवळ भावनिक मुद्दा नाही तो एक तुमच्या शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतो हे  दर्शविणारे संशोधन अभ्यास असे सूचित करतात की दीर्घकालीन एकटेपणामुळे अकाली मृत्यूचा धोका वाढू शकतो जसे की दिवसाला १५ सिगारेट ओढणे यामुळे हृदयरोग, स्ट्रोक, नैराश्य आणि चिंता यांचे प्रमाण वाढू शकते. तज्ञ आता एकटेपणाला सार्वजनिक आरोग्य समस्या मानत आहेत, समुदायांना आणि आरोग्य सेवा प्रदात्यांना सामाजिक अलगाव दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन करत आहेत.

मसाला एकटेपणा केव्हा येतो (When a man feels lonely) :- जगामध्ये एकूण ८,२३१,६१३,०७० (८.२ अब्ज) लोक आहेत तरी सुद्धा काही लोक एकटे असतात कशामुळे, याचे अनेक कारण असू शकतात आपण जेव्हा जल्म घेतो तेव्हा आपण आपण एकटे असतो तसेच जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा सुद्धा आपण एकटेच असतो आपण कोणाला सोबत घऊन जाऊ शकत नाही. व्यक्ती जेव्ह एकटेपणा ला सामोरे जातो तेहवा तो निराश होतो त्याला एक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे विचार येत असतात तसेच त्याला कुठल्या ही गोष्टी ची चिंता जास्त होत असते. अनेक व्यक्ती हे आयुष्या मध्ये एकटे असतात कोणी नौकरी किवा पुढील शिक्षणा साठी सुसऱ्या शहरात व दुसऱ्यादेशात जात असतात त्यावेळेस त्यांना एकटेपणा येत असतो दुसऱ्या दूर ठिकाणे असल्या मुळे ते परिवारा पासून लाम असतात त्यांना परिवाराची आठवण येत असते अशा मुळे सुद्धा व्यक्तीला एकटेपणा येतो. आज च्या आधुनिक युगा मध्ये सर्वात जास्त लोक हे तरुण लोक आहेत. तरुणांना सर्वात जास्त एकटेपणा ला सामोरे जावे लागत आहे १८ ते ३४ वय गटात हे सर्वात जास्त प्रमाणात बघाल मिळते.

एकटेपणा कसा दूर करावा ? (How to stop feeling lonely ?) – एकटेपणा दूर कराचा असेल तर काही उपाय करावे लागतील

(उपाय ):-१.आनंदी राहण्याचा प्रयत्न करा एकटेपणा दूर करण्यासाठी तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक चित्रपट पाहणे, गाणे ऐकणे, आवडत्या ठीकाणी फिरायला जाणे अश्या गोष्टी करुन तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करु शकता.

(उपाय):-२.वातावरणात बदल तुमच्या सभोवतालच्या वातावरणात बदल करणे गरजेचं आहे. जोपर्यंत तो बदल होणार नाही तो पर्यंत तुम्ही एकटेपणा दूर करु शकत नाही.

उपाय :- ३.काहीतरी काम करा तुम्ही खाली वेळेमध्ये तुमच्या आवडिच काम करत रहा. तुमचे छंद जोपासा.

उपाय :-४.परिवारासोबत वेळ घालवणे जेव्हा तुम्हाला एकटेपणा जाणवत असेल तेव्हा तुमच्या परिवारासोबत वेळ घालवायला पाहिजे. कोणत्या अडचणी तुमच्या आयुष्यात निर्माण झाल्या असतील तर त्याबद्दल तुम्ही तुमच्या परिवारासोबत, मित्रांसोबत चर्चा करा.

उपाय :-५.मित्रमैत्रिणींना भेटा एकटेपणा दूर करण्यासाठी मित्रमैत्रिणींना भेटणं, त्यांच्यासोबत गप्पा मारणे, बाहेर फिरायला जाणे यामुळे एकटेपणा आणि तणाव दूर करण्यास मदत होते.

Loneliness
Loneliness has followed me my whole life. Everywhere. In bars, in cars, sidewalks, stores, everywhere. There’s no escape. I’m God’s lonely man :- From Taxi Driver (Movie)

उपाय ६:- पुस्तक वाचन आणि योगासन करा सतत मन अशांत असल्याने तणाव वाढू लागतो. याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे तुमच मन शांत आणि एकाग्र करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहीजे. तुम्ही तुमच्या आवडिचे पुस्तक वाचा. पुस्तक वाचल्याने मन एकाग्र होण्यास मदत होते. सकाळी लवकर उठून योगासन करा.

अधीक माहिती पहा : https://en.wikipedia.org/wiki/Loneliness#:~:text=Loneliness

Read More : https://aaplisatta.com/jsw-group-new-investment-plan-in-maharashtra/

delhi election date 2025 | दिल्ली मतदानाची तारीख जाहीर २०२५

delhi election 2025

delhi election date 2025 | दिल्ली मतदानाची तारीख जाहीर २०२५

दिल्ली सद्या आपल्या येणाऱ्या २०२५ च्या आगामी विधानसभा निवडणुकांमुळे चर्चेत आहे . दिल्लीच्या राज्य निवडणूक आयोगामार्फत दिल्लीत होणाऱ्या आगामी २०२५ सालच्या निवडणूकिची तारीख जाहीर केली आहे . व विधानसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख देखील निवडणूक आयोगा तर्फे जाहीर करण्यात आली आहे, व दरम्यान या संबंधित देशाचे लक्ष्य दिल्लीच्या या आगामी विधानसभाच्या निवडणुकीकडे लागले आहे. कारण येणाऱ्या काळात भारताच्या राजधानीत कोणाची विजय पताका फडकताना दिसणार हे पाहणं अति महत्वाचे आहे ,व कोणता उमेदवार दिल्लीच्या राजगादीवर आपली सत्ता प्रस्थापित करणार ?

delhi election 2025
delhi election 2025

दिल्ली मतदानाची तारीख जाहीर :

दिल्लीत सध्या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सर्व पक्ष करत आहेत . व या संबंधित निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची तारीख ५ फेब्रुवारी जाहीर केली आहे . व निवडणुकीचा निकाल हा ८ फेब्रुवारी ला लावण्यात येईल असं हि निवडणूक आयेगा तर्फे सांगण्यात आलेले आहे .

 

अधिक वाचा :https://www.loksatta.com/politics/delhi-assembly-election-2025

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे उमेदवार :

दिल्ली विधानसभा निवडणुकीत सर्व पक्षांनी आप आपले उमेदवार या निवडणुकीत उभे केले आहेत , या निवडणुकीत कोण- कोणते उमेदवार उभे आहेत व ते कोणत्या पक्षाचे आहेत हे खालील तक्त्याच्या आधारे आपण पाहू शकतो …..

SR Candidate Name Constituency Political Party
1 Arvind Kejriwal New Delhi AAP
2 Atishi Kalkaji AAP
3 Manish Sisodia Jangpura AAP
4 Awadh Ojha Patparganj AAP
5 Alka Lamba Kalkaji Congress
6 Ramesh Bidhuri Kalkaji BJP
7 Parvesh Verma New Delhi BJP
8 Sandeep Dixit New Delhi Congress
9 Satyendra Jain Shakur Basti AAP
10 Amanatullah Khan Okhla AAP
11 Somnath Bharti Malviya Nagar AAP
12 Arvinder Singh Lovely Gandhi Nagar BJP
13 Kailash Gahlot Bijwasan BJP
14 Kapil Mishra Karawal Nagar BJP

JSW Group New Investment In Maharashtra

JSW GROUP NEW INVESTMENT IN MAHARASHTRA

“JSW Group New Investment Plan In Maharashtra | महाराष्ट्रात JSW ग्रुप ची नवीन गुंतवणूक”

JSW GROUP NEW INVESTMENT IN MAHARASHTRA
JSW GROUP NEW INVESTMENT IN MAHARASHTRA

भारतातील सर्वात वेगाने प्रगतीच्या पथावर धावणाऱ्या समुहांपैकी एक JSW या समूहाने 21जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्रात एक नवीन औद्योगिक गुंतवणूक जाहीर केले आहे . व त्याच बरोबर महाराष्ट्र सरकार बरोबर या संबंधित सामंजस्य करार ( MOU) देखील केला आहे.

दवोसयेथील जागतिक आर्थिक मंचात (WEF) घोषित करण्यात आलेल्या या महत्वाकांक्षी भागीदारी मध्ये JSW ग्रुप महाराष्ट्र राज्यातील  प्रमुख क्षेत्रांमध्ये 3 कोटी रुपयांची मोठी आर्थिक गुंतवणूक करेल , ज्यामुळे भारतातील आघाडीचे औद्योगिक केंद्र म्हणून महाराष्ट्र राज्याचे स्थान हे अजून मजबूत होईल.

JSW Group ची New Investment ही गुंतवणूक कोणत्या क्षेत्रांवर प्रामुख्याने केंदित आहे व त्यात कोणते उद्योग समाविष्ट आहेत ?

“ही गुंतवणूक काही महत्वाच्या क्षेत्रात केलेली आहे जे पुढील प्रमाणे आहेत….”

✓   स्टील – उच्य तंत्रद्यानासह स्टील उत्पादन क्षमतांचा विस्तार आणि त्यांची वाढ होईल.

✓   अक्षय ऊर्जा –  अती महत्त्वाकांक्षी प्रकल्प ज्यात भविष्यासाठी हरित ऊर्जा प्रकल्पांचे अग्रगण्य

✓ इलेक्ट्रिक वाहने ( E Vheicles) : नवीन प्रगत औद्योगिक विकासाच्या बाबतीत इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रगत उत्पादन युनिट्स ची स्थापना

✓  लिथियम – आयरोन बॅटरी  :  उच्य कार्यक्षमता आणि अधिक काळ टीकणाऱ्या इलेक्ट्रिक बॅटरी साठी सुविधा विकसित करणे

✓ सोलर वेफर आणि सेल मॉड्युल : सौर ऊर्जा आणि परिसंस्था मजबूत आणि विकसित करणे

✓ पायाभूत सुविधा आणि सिमेंट: महाराष्ट्रच्या पायाभूत परिवर्तनाला चालना देणे

“या उपक्रमाचे प्रमख उद्दिष्ट आणि संकल्पना “

या उपक्रमाचे उद्दिष्ट धोरणात्मक आहे व याची प्रमुख संकल्पना महाराष्ट्रात हजारो रोजगार निर्माण करणे आहे .
औद्योगिक आणि आर्थिक क्षमता वाढवून विकासात योगदान देणे आहे . सामंजस्य करारानुसार (MOU) महाराष्ट्र सरकार धोरणांनुसर मंजुरी जलद करून , आर्थिक प्रोत्साहन देऊन जमीन , पाणी वीज आणि इतर पायाभूत सुविधांची उलब्धता सुनिश्चित करून गुंतवणूक सुलभ करेल .

JSW Group New Investment या वरती महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली अपेक्षा आणि नवीन औद्योगिक गुंतवणूक जाहीर केले आहे.

ते म्हणाले…..

” महाराष्ट्रातील स्टील , सौरऊर्जा , ऑटो आणि सिमेंट अश्या प्रमुख क्षेत्रांमध्ये विविध गुंतवणूक करणारी कंपनी असलेल्या JSW स्टील सोबत सामंजस्य( MOU) करार करणे हे गडचिरोलीला भारताचे पोडद शहर (Iron City )
म्हणून विकसित करण्याच्या आमच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे . इलेक्ट्रिक वाहने आणि शाष्वतेवर त्यांचे लक्ष केंद्रित करणे यासह महाराष्ट्राशी JSW ची सततची वचनबध्दता. आपल्या राज्याच्या क्षमतेवर त्यांच्या विश्वासाचे स्पष्ट प्रमाण आहे . मला विश्वास आहे की हे सहकार्य महाराष्ट्राचे औद्योगिक आणि आर्थिक पॉवर हाऊस म्हणून स्थान अधिक मजबूत करेल . नवीन रोजगार निर्मिती आणि आपल्या लोकांसाठी दीर्घकालीन समृध्दी वाढेल ”

Mr. Sajjan Jindal, Chairman of JSW Group

JSW ग्रुप चे अध्यक्ष श्री. सज्जन जिंदाल यांनी ही यावर आपले मत मांडले आहे , ते म्हणाले

” हा सामंजस्य करार महाराष्ट्राप्रती आमची अटळ वचनबध्दता दर्शवतो, JSW ग्रुप च्या विकास आणि नवोन्मेशाच्या प्रवासात महत्वाचे राज्य राहिलेले आहे. या भागीदारीद्वारे, आम्ही माननीय पंत प्रधान नरेंद्र मोदीजी
यांच्या स्वच्छ आणि हरित भारताच्या दृषटिकोनाकडे आणखी एक पाऊल टाकतो. ही गुंतवणूक केवळ औद्योगिक विकासाला चालना देणार नाही तर शाश्वत तंत्रज्ञान , स्वच्छ गतिशीलता आणि अक्षय ऊर्जा उपायांसह भारताच्या हरित संक्रमणाला देखील चालना देईल . माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारचे त्यांच्या दूरदर्शी दृष्टिकोन आणि उद्योग अनुकूल धोरणाबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत. ज्यामुळे अशा प्रकारचे परिवर्तनकारी उपक्रम शक्य झाले आहेत ”

समावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाच्या राज्याच्या दृषटिकोनाशी सुसंगत, गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राचे स्थान एक सर्वोच्य गंतव्यस्थान म्हणून बळकट करण्यासाठी ही भागीदारी सज्ज आहे.

Bird flu outbreak in eastern Maharashtra | पूर्व महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यू चा शिरकाव , पशुसंवर्धन विभाग आता उपाययोजनेसाठी ॲक्शन मोड मध्ये

bird flue

Bird flu outbreak in eastern Maharashtra | पूर्व महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यू चा शिरकाव , पशुसंवर्धन विभाग आता उपाययोजनेसाठी ॲक्शन मोड मध्ये

 

 

bird flue
bird flue

 

Bird flu outbreak in Maharashtra|पूर्व महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यू चा शिरकाव :

मराठवाड्यात बर्ड फ्लूचा परिणाम झाला आहे आणि त्याचे लक्षणं देखील लोकांमध्ये दिसून येत आहे. मराठवाड्यातील लातूर नंतर आता नांदेड जिल्ह्यात देखील बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला आहे . लोहा तालुक्यातील किवळा येथील मृत कुकुट पक्षांचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने प्रशासन सतर्क झाले असून पशुसंवर्धन विभागाकडून उपयाजोजना सुरू करण्यात आल्या आहेत . या दरम्यान नांदेडमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने नांदेड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

 

 

 

 

संबंधित पुरावे व अंमलबजावणी

लोह तालुक्यातील कीवळा येथील शेतकरी पंजाब टरके यांच्या मोकळ्या कूकुट पालन केंद्रातील कोंबड्यांचे 20 पिल्ले संक्रमित होऊन मृत अवस्थेत आधळले होते . पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत मृत कुकुट पक्ष्यांचे नमुने पुणे आणि भोपाळ येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात आले . त्याचा अहवाल आज मिळाला असून त्या अहवालात मृत पिल्यांचे नमुने हे पोझीटीव्ह आले आहेत.
मृत कुकुट पक्ष्यांना बर्ड फ्लुची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे . त्यामुळे कीवळा येथील दहा किलोमिटर परिसरात अलर्ट झोन घोषित करण्यात आले आहे . दरम्यान तातडीने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून 565 कुकट
पशुसंवर्धन विभागाने ताब्यात घेऊन त्यांची विल्हेवाट लावली आहे.

 

 

 

 

 

प्रशासनाकडून उपाययोजना

 

 

आजूबाजूच्या परिसरात बर्ड फ्लूचा प्रसार होऊ नये म्हणून , यासाठी कीवळा येथील दहा किलोमिटर क्षेत्रात अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे . या परिसरात कुकुट पक्ष्यांची खरेदी -विक्रीची दुकाने,अंडी , किकुट मांसाची चिकन दुकाने,वाहतूक ,बाजार आणि यात्रा बंद राहणार अस स्पष्ट करण्यात आले आहे. बर्ड फ्ल्यू रोगाबाबत अनावश्यक भीती बाळगू नये . आणि अफवा वरती विश्वास ठेव् नये असे प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे . आणि या आजाराबाबत परिसरात गैरसमज पसरवू नये असे ही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे . दरम्यान जिल्ह्यात कुठेही या रोगाबबत लक्षणं आढळले की त्वरित जवळील पशू वैद्यकीय रुग्णालयात संपर्क साधण्याचे आवाहन पशुसंवर्धन अधिकारी राजकुमार पडिले यांनी केले आहे.