What causes kidney failure and what is its solution | किडनी खराब कशामुळे होते व त्यावरील उपाय काय आहेत जाणून घ्या नाहीतर यावरील दुर्लक्ष तुमच्या जीवावर भारी पडेल…..

What causes kidney failure and what is its solution

What causes kidney failure and what is its solution | किडनी खराब कशामुळे होते व त्यावरील उपाय काय आहेत जाणून घ्या नाहीतर यावरील दुर्लक्ष तुमच्या जीवावर भारी पडेल…..

 

What causes kidney failure and what is its solution
What causes kidney failure and what is its solution

 

मानवी शरीरातील किडनी हा अवयव अति महत्वाचा आणि प्रमुख आहे, त्या शिवाय मानवी जीवन आपण जगूच नाही शकत . त्यासाठी किडनीची निघा राखणे अति आवश्यक आहे , व किडनीची निघा कशी राखावी आणि त्या वरील लक्ष्य देण्याच्या उपाययोजना आपण आज माहिती करून घेणार आहोत , किडनी हा अवयव मानवी शरीरातील रक्त शुद्ध करून विषारी पदार्थ बाहेर टाकतो.

किडनी खराब असल्याची लक्षणे हि सुरुवातीला सौम्य असू शकतात त्यामुळे ती लक्षणे आपल्या सहसा लक्षत येत नाहीत . त्यातच त्यावर दुर्लक्ष्य झाल्यावर आणि वेळेवर योग्य उपचार न झाल्यास गंभीर समस्या उदभवू शकतात .त्यामळे किडनी खराब झाल्याची लक्षणे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहेत . व ती लक्षणे कोण कोणती आहेत ती आपण पुढील  प्रमाणे जाणून घेऊया …….

 

Major symptoms of kidney failure
Major symptoms of kidney failure

 

किडनी खराब असल्याची प्रमुख लक्षणे – Major symptoms of kidney failure

 

१ . लघवी ला फेस येणे आणि लघवीचा रंग हा गडद होणे

 * वारंवार लघवी अति प्रमाणात करणे किंवा लघवी ला जाण्याचे प्रमाण कमी होणे

 * लघवी करताना रक्त येणे

 

२. शरीरावरील इतर अवयवावर सूज येणे  

हात, पाय, चेहरा किंवा डोळ्यांच्या खाली सूज येणे

शरीरात पाणी साचल्यामुळे वजन अचानक वाढणे

 

३. शरीराला नेहमी थकवा आणि अशक्तपणा वाटणे

* किडनी आपले काम नियमितपणे न केल्यामुळे शरीरात टॉक्सिन जमा होतात आणि त्यामुळे शरीराला थकवा येतो

*  शरीरात रक्ताचा स्थर कमी होणे व त्यामुळे शरीरात अशक्तपणा जाणवणे

 

४ . भूक ना लागणे आणि जेवणाची अनियमितता आणि जेवनाबद्धल अउत्सुकता वाटणे

 –  शरीरातील पचन क्रियेत अडथडा होऊन खाण्याची इच्छा कमी होणे

 –  सतत उलटी होन्याची शक्यता  किंवा मळमळ होणे 

  

५. किडनी खराब असल्याने त्वचे वर परिणाम किंवा त्वचेला सतत खाज किंवा खरूज येणे

त्वचेला कोरडेपणा , खाज किंवा चट्टे पडणे

–  शरीरातील विषारी घटक बाहेर न टाकल्याने त्वचेवर परिणाम होतो

 

६. किडनी खराब असल्याने मानवी शरीराला श्वास घेण्यास त्रास होतो

शरीरात पाणी साचल्याने फुपुसंवर दडपण येते व श्वास घेणास अडथडा निर्माण होतो

– मुख्यतः दम लागतो त्याच प्रमुख कारण रक्तातील आक्सिजन ची कमी होणे आहे.

 

७. उच्य रक्तदाब

– किडनी आपले कार्य नियमित पणे न केल्याने रक्तदाब वाढतो आणि त्याचा परिणाम हृदयावर अतिरिक्त ताण टाकतो

 

 

Important measures and solutions to prevent kidney damage
Important measures and solutions to prevent kidney damage

 

किडनी खराब होऊ नये म्हणून महत्वाच्या उपाययोजना व उपाय – Important measures and solutions to prevent kidney damage

 

१. संतुलित आहार घ्या आणि आपल्याआहारात नियमित प्रमाण घ्या

– आहारात मिठाचे प्रमाण कमी किंवा मर्यादित ठेवा
– कड धान्य, फळे आणि पाले भाज्या खा जेणे करून शरीरात प्रथिने तयार होतील
– सोडियम, पोटॅशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण नियंत्रित असलेला आहार घ्या.

 

२. नियमित व्यायाम करा

– दररोज किमान ३०-४५ मिनटे योगासने ,चालणे किंवा सायकलिंग करा
– रक्तदाब आणि साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी शारीरिक सक्रियता हालचाल आहे.

३. नियमित पाणी प्या

– दररोज नियमित ८-१० ग्लास पाणी प्या जेणे करून रक्त स्वच्छ होईल आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतील
– अधिक पाणी पपिल्याने किडनीतील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते

४. धूम्रपान आणि मद्यपान टाळा

– धूम्रपान निकोटीन आणि अल्कोहॉल हानिकारक पदार्थ किडनीला नुकसान करतात.

५. औषधांचा मर्यादित वापर करा

– पेनकिलर किंवा इतर औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या.
– किडनीसाठी हानिकारक ठरणारी औषधे सहसा घेणे टाळा
– व कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या

६. नियमित वैद्यकीय तपासणी करा

– मधुमेह आणि रक्तदाब असल्यास नियमितपणे किडनीचे कार्य तपासून घ्या.
– क्रिएटिनिन आणि युरिया पातळी तपासणे आवश्यक आहे.

 

 

“यावरील अधिक माहिती साठी एकदा आपल्या डॉक्टरांच्या सल्ला घ्या आणि आपल्या शारीरिक नुकसानापासून दूर राहा”

Chhava Movie Review – कसा आहे विकी कौशल चा छावा ? छावा चित्रपट पाहण्या आधी हा रेव्हिएव वाचा….

CHHAVA MOVIE REVIEW

CHHAVA MOVIE REVIEW :- कसा आहे विकी कौशल चा छावा ? छावा चित्रपट पाहण्या आधी हा रेव्हिएव वाचा,

 

Chhava Movie Review : विकी कौशलने ‘छावा’ चित्रपटाची अनेक दिवसांपासून चर्चा होती. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा हा चित्रपट पाहायला जात असाल तर त्याआधी हा रिव्ह्यू एकदा नक्की वाचा.

 

CHHAVA MOVIE REVIEW
CHHAVA MOVIE REVIEW

 

CHHAAVA MOVIE CAST :-

1.विकी कौशल,

2.रेशमिका मंदाना,

3.अक्षय खन्ना,

4.अशुतुष राणा,

5.दिव्या दत्ता,

6.प्रदीप राम सिंग रावत,

7.संतोष जुईकर ,

8.नील भूपालां,

9.विनीत कमर सिंग,

10.डायना पेंटी….

 

जाणून घ्या कोण आहे विकी कौशल :-

विकी कौशल हा एक भारतीय अभिनेता आहे ज्याचा जन्म 16 मे 1988 रोजी मुंबई येथे झाला होता. तो मसान (2015) त्याने या चित्रपटापासून डेबीयू केला, त्या नंतर त्याने सर्जिकल स्ट्राईक, सरदार उधम, सॅम बहादूर आणि आता ‘छावा’ चित्रपटातून विकी कौशल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यावेळी तो छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपात पडद्यावर अवतरला आहे. ‘छावा’ मध्ये विकीची मेहनत स्पष्ट दिसून येते, त्याने संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी जीव ओतले आहेत. प्रचंड परिश्रम घेतले आहेत. काय आहे छावाचा रिव्हू? चित्रपट पाहायला जाण्याआधी हा रिव्ह्यू वाचायला हवाय.

विकीचे वडील शाम कौशल हे अक्शन डायरेक्टर आहेत , त्याचा धाकटा भाऊ सनी कौशल देखील एक अभिनेता आहे. विकीने मुंबईतील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेशालेय आणि महाविद्यालयीन काळात तो रंगभूमीवर काम करत होता, २०११ मध्ये त्यांनी लाल पेन्सिल या नाट्यनिर्मितीतून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली, त्यांनी गँग्स ऑफ वासेपूर (२०१२) मध्ये अनुराग कश्यप यांच्या सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली, त्यांनी २०२१ मध्ये अभिनेत्री कतरिना कैफशी लग्न केले.

 

CHHAVA MOVIE REVIEW
CHHAVA MOVIE REVIEW

 

Chhaava Review in Marathi:

अजय देवगनच्या भारदस्त आवाजात सिनेमाची सुरुवात होते. सिनेमाच्या पहिल्याच सीनमध्ये औरंगजेब म्हणजेच अक्षय खन्नाची एण्ट्री होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनाची वार्ता ऐकून औरंगजेब खूश होतो.

शेर नही रहा, लेकीन छावा अभी भी जंगल मै घुम रहा है” या डायलॉगने सुरु झालेल्या छावा चित्रपटाच्या ट्रेलरने अंगावर काटा आणला होता. चित्रपटाचा टीझर आणि त्यानंतर आलेल्या ट्रेलरनंतर अख्ख्या महाराष्ट्रासह देशाला सिनेमाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा होती. ट्रेलरमध्ये विकी कौशल आणि अक्षय खन्नाचे डायलॉग आणि अॅक्टिंगने प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. सिनेमाची कथा कशी असेल, त्याची मांडणी कशी असले, डायलॉग कसे असतील?

याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. चित्रपट आता प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे चित्रपट नेमका कसा आहे यावर एक नजर टाकुया. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर याने छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास रुपेरी पडद्यावर उतरवण्याचं शिवधनुष्य हाती घेतलं होतं. छत्रपती संभाजी महाराज जगाला कळावे हा प्रामाणिक हेतू दिग्दर्शकाचा होता.

मात्र सिनेमा रिलीज झाल्यानंतर असं दिसतंय की विकी कौशल, रश्मिका मंदानासह अनेक कलाकार ऐतिहासिक कलाकृती सादर करताना अभिनयात काहीसे कमी पडले. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल आणि महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत रश्मिका मंदाना दिसत आहे. तर औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना आहे.

 

सिनेमाची सुरुवात :-

अजय देवगनच्या भारदस्त आवाजात सिनेमाची सुरुवात होते. सिनेमाच्या पहिल्याच सीनमध्ये औरंगजेब म्हणजेच अक्षय खन्नाची एण्ट्री होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनाची वार्ता ऐकून औरंगजेब खूश होतो. औरंगजेबाला वाटतं की मराठा साम्राज्य आता संपलं आणि त्यावर कब्जा करणं सोपं होईल. मात्र औरंगजेबाच्या स्वप्नांचा क्षणात चुराडा करत छत्रपती संभाजी महाराज बुरहानपूर आक्रमण करत मुघलांच्या सैन्याला धुळ चारतात. ट्रेलरमध्ये हाच सीन दाखवण्यात आला होता. संभाजी महाराजांच्या या आक्रमणानंतर औरंगजेबाचा तिळपापड होतो आणि तो संतापून मराठा साम्राज्य नष्ट करण्याची शपथ घेतो. सिनेमाच्या सुरुवातीलाचा हा मोठा सीन आहे.

 

 

CHHAVA MOVIE REVIEW
CHHAVA MOVIE REVIEW

गाजलेले डालोग:-

सिनेमा जसा पुढे सरकतो, तसं सिनेमावरची पकड काहीशी सुटताना दिसत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट म्हणून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा त्याकडून होत्या. मात्र सिनेमातील डायलॉग कुठेतरी मार खाताना दिसले. महाराजांचा इतिहास उभा करताना प्रत्येक डायलॉगवर टाळ्या पडतील,अशी अपेक्षा होती. मात्र विकी कौशलचा आवाज आणि डायलॉग डिलिव्हरी यामुळे प्रेक्षकांमध्ये तो जोश निर्माण झाला नाही.

 

Chhava Movie Review By Public – छावा चित्रपटाचे सार्वजनिक पुनरावलोकन

या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती दिसून येत आहे. नेटकऱ्यांकडून या चित्रपटाचं कौतूक होताना दिसतय. अंगावर शहारे आणणारा चित्रपट असल्य प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. एका प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देत, चित्रपट फार आवडल्याचं म्हटलं आहे. तर एका चाहत्याने विकीच्या अभिनयाचं कौतूक करत ‘विकी तु खरंच छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य जगलास’ असं म्हटलं आहे.

तर एका चाहत्यांने प्रतिक्रिया देत ‘छावातील क्लायमॅक्स तुम्हाला स्तब्ध आणि आवक करेल’ असं म्हटलं आहे. चित्रपटात लोकांकडून जयघोषही करण्यात आला. सोशल मीडियावर हाऊसफुल झालेल्या शोचे व्हिडिओ प्रेक्षकांनी शेअर केले आहे. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोषही करण्यात आला. या चित्रपटात अक्षय खन्ना याने औरंगजेबाची भूमिका साकारली होती. दरम्यान अक्षय खन्नाच्या अभिनयाला प्रेक्षकांनी पसंती दाखवली आहे. त्याच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी कौतूक केलं आहे.

 

CHHAVA MOVIE Big Twist-  मोठा ट्विस्ट :-

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सिनेमात कोणीही साकारत नाहीये. याजागी बॅकग्राऊंड व्हॉइस ओव्हर देऊन महाराज शंभूराजेंना वेळोवेळी कसे मार्गदर्शन करतात हे पाहायला मिळतं. ‘छावा’चा पहिला भाग काहीसा संथगतीने जातो. तर, दुसऱ्या भागात म्हणजेच मध्यातरानंतर वेगाने हालचाली होतात.

शेवटचा अर्धा तास प्रत्येकाला नि:शब्द करून टाकतो. ‘छावा’ कादंबरीत जसा आहे अगदी तसाच क्लायमॅक्स प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळतो… महाराजांना औरंगजेबाने दिलेला शारीरिक त्रास, तरीही शेवटपर्यंत धर्मासाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी लढलेले महाराज या गोष्टी दिग्दर्शकाने अतिशय भावनिकदृष्ट्या मांडल्या आहेत.

कुठेही काहीच खटकत नाही… फक्त तो छळ पाहताना अंगावर शहारा अन् डोळ्यात पाणी जरूर येईल. महाराजांचे शेवटचे क्षण आणि येसूबाईंनी तेवढ्याच खंबीरपणे घेतलेले निर्णय याची जोडणी क्लायमॅक्सला अगदी उत्तमप्रकारे केलेली दिसते. शेवटी शंभूराजेंचा एवढा छळ करून औरंजेबाच्या हाती येते ती फक्त हतबलता

 

Katrina Kaif (कतरीना कैफ ची प्रतिक्रिया) :-

छत्रपती संभाजी महाराजांची गाथा अतिशय जिवंतपणाने मांडण्यात आली आहे. सिनेमा पाहून मी थक्क झाले. चित्रपटामुळे माझ्यावर जो प्रभाव पडलाय तो मी शब्दात नाही सांगू शकत. सिनेमातल्या सगळ्याच कलाकारांनी अभूतपूर्व काम केलं आहे. विकी, तू तर उत्तम आहेसच पण तु जेव्हा पडद्यावर येतोस तेव्हा जिवंतपणा आणतोस. तुझं काम पाहून खूप छान वाटलं.

 

“अधिक माहिती पहा”

 

अधिक वाचा : https://aaplisatta.com/10-richest-actors-in-india/

 

 

RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32438 जागांसाठी मेगा भरती

RRB Group D Bharti 2025

RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32438 जागांसाठी मेगा भरती

 

RRB Group D Bharti 2025
RRB Group D Bharti 2025

 

RRB Group D Bharti 2025. Railway Group D Bharti 2025:

भारत सरकार ,रेल्वे मंत्रालया च्या वतीने ,रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) द्वारे भारतीय रेल्वेत  ग्रुप -D भरती प्रक्रियेचे व्यवस्थापन भारतीय रेल्वे भरती बोर्ड द्वारे करण्यात आले आहे , ज्याचा उपयोग भारतीय रेल्वेमध्ये विविध भूमिका भरण्यासाठी केला जातो, या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवून घेण्याची मोठी संधी आहे . तरी इच्छुक उमेदवारांनी सर्व भरती प्रक्रिया व सविस्तर संबंधित जाहिरात वाचून या पदांसाठी अर्ज करावा .

संबंधित अधिक माहिती पाहण्यासाठी खाली माहिती उपलब्ध आहे ….

What is group D in Indian Railways? |भारतीय रेल्वेमध्ये गट डी म्हणजे काय?

भारतीय रेल्वेत ग्रुप D ही सर्वात निम्न श्रेणीतील नोकरी श्रेणी आहे. या पदांमध्ये मुख्यत-अतांत्रिक (Non-Technical) कामे असतात आणि त्यामध्ये हाताने काम करणे, देखभाल-दुरुस्ती आणि सहाय्यक प्रकारची जबाबदारी असते. रेल्वेच्या सुरळीत व्यवस्थापनासाठी या कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते.

पदाचे नाव  Job Title
ट्रॅक मेंटेनर (गंगमॅन) Track Maintainer (Gangman)
हेल्पर (इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिग्नल & टेलिकॉम) Helper (Electrical, Mechanical, Signal & Telecom)
असिस्टंट पॉईंट्समन Assistant Pointsman
पोर्टर (हमाल) Porter (Hamal)
स्वच्छता कर्मचारी (सफाईवाला) Sanitation Worker (Safaiwala)
शिपाई (Peon) Peon
हॉस्पिटल अटेंडंट (रुग्णालयातील मदतनीस) Hospital Attendant

 

RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32438 जागांसाठी मेगा भरती

 

जाहिरात क्रमांक : CEN No.08/2024

 

पदाचे नाव & तपशील:

पदाचे नाव पद संख्या
ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅक मेंटेनर) 32,438
TOTAL 32,438

 

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण किंवा ITI

वयाची अट: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹500/-(SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-)

 

महत्त्वाच्या तारखा:

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2025

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

 

महत्वाच्या लिंक्स : 

विवरण लिंक
जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाईट Click Here
Age Calculator Click Here