आपली सत्ता

JSW Group New Investment In Maharashtra

“JSW Group New Investment Plan In Maharashtra | महाराष्ट्रात JSW ग्रुप ची नवीन गुंतवणूक”

JSW GROUP NEW INVESTMENT IN MAHARASHTRA
JSW GROUP NEW INVESTMENT IN MAHARASHTRA

भारतातील सर्वात वेगाने प्रगतीच्या पथावर धावणाऱ्या समुहांपैकी एक JSW या समूहाने 21जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्रात एक नवीन औद्योगिक गुंतवणूक जाहीर केले आहे . व त्याच बरोबर महाराष्ट्र सरकार बरोबर या संबंधित सामंजस्य करार ( MOU) देखील केला आहे.

दवोसयेथील जागतिक आर्थिक मंचात (WEF) घोषित करण्यात आलेल्या या महत्वाकांक्षी भागीदारी मध्ये JSW ग्रुप महाराष्ट्र राज्यातील  प्रमुख क्षेत्रांमध्ये 3 कोटी रुपयांची मोठी आर्थिक गुंतवणूक करेल , ज्यामुळे भारतातील आघाडीचे औद्योगिक केंद्र म्हणून महाराष्ट्र राज्याचे स्थान हे अजून मजबूत होईल.

JSW Group ची New Investment ही गुंतवणूक कोणत्या क्षेत्रांवर प्रामुख्याने केंदित आहे व त्यात कोणते उद्योग समाविष्ट आहेत ?

“ही गुंतवणूक काही महत्वाच्या क्षेत्रात केलेली आहे जे पुढील प्रमाणे आहेत….”

✓   स्टील – उच्य तंत्रद्यानासह स्टील उत्पादन क्षमतांचा विस्तार आणि त्यांची वाढ होईल.

✓   अक्षय ऊर्जा –  अती महत्त्वाकांक्षी प्रकल्प ज्यात भविष्यासाठी हरित ऊर्जा प्रकल्पांचे अग्रगण्य

✓ इलेक्ट्रिक वाहने ( E Vheicles) : नवीन प्रगत औद्योगिक विकासाच्या बाबतीत इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रगत उत्पादन युनिट्स ची स्थापना

✓  लिथियम – आयरोन बॅटरी  :  उच्य कार्यक्षमता आणि अधिक काळ टीकणाऱ्या इलेक्ट्रिक बॅटरी साठी सुविधा विकसित करणे

✓ सोलर वेफर आणि सेल मॉड्युल : सौर ऊर्जा आणि परिसंस्था मजबूत आणि विकसित करणे

✓ पायाभूत सुविधा आणि सिमेंट: महाराष्ट्रच्या पायाभूत परिवर्तनाला चालना देणे

“या उपक्रमाचे प्रमख उद्दिष्ट आणि संकल्पना “

या उपक्रमाचे उद्दिष्ट धोरणात्मक आहे व याची प्रमुख संकल्पना महाराष्ट्रात हजारो रोजगार निर्माण करणे आहे .
औद्योगिक आणि आर्थिक क्षमता वाढवून विकासात योगदान देणे आहे . सामंजस्य करारानुसार (MOU) महाराष्ट्र सरकार धोरणांनुसर मंजुरी जलद करून , आर्थिक प्रोत्साहन देऊन जमीन , पाणी वीज आणि इतर पायाभूत सुविधांची उलब्धता सुनिश्चित करून गुंतवणूक सुलभ करेल .

JSW Group New Investment या वरती महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली अपेक्षा आणि नवीन औद्योगिक गुंतवणूक जाहीर केले आहे.

ते म्हणाले…..

” महाराष्ट्रातील स्टील , सौरऊर्जा , ऑटो आणि सिमेंट अश्या प्रमुख क्षेत्रांमध्ये विविध गुंतवणूक करणारी कंपनी असलेल्या JSW स्टील सोबत सामंजस्य( MOU) करार करणे हे गडचिरोलीला भारताचे पोडद शहर (Iron City )
म्हणून विकसित करण्याच्या आमच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे . इलेक्ट्रिक वाहने आणि शाष्वतेवर त्यांचे लक्ष केंद्रित करणे यासह महाराष्ट्राशी JSW ची सततची वचनबध्दता. आपल्या राज्याच्या क्षमतेवर त्यांच्या विश्वासाचे स्पष्ट प्रमाण आहे . मला विश्वास आहे की हे सहकार्य महाराष्ट्राचे औद्योगिक आणि आर्थिक पॉवर हाऊस म्हणून स्थान अधिक मजबूत करेल . नवीन रोजगार निर्मिती आणि आपल्या लोकांसाठी दीर्घकालीन समृध्दी वाढेल ”

Mr. Sajjan Jindal, Chairman of JSW Group

JSW ग्रुप चे अध्यक्ष श्री. सज्जन जिंदाल यांनी ही यावर आपले मत मांडले आहे , ते म्हणाले

” हा सामंजस्य करार महाराष्ट्राप्रती आमची अटळ वचनबध्दता दर्शवतो, JSW ग्रुप च्या विकास आणि नवोन्मेशाच्या प्रवासात महत्वाचे राज्य राहिलेले आहे. या भागीदारीद्वारे, आम्ही माननीय पंत प्रधान नरेंद्र मोदीजी
यांच्या स्वच्छ आणि हरित भारताच्या दृषटिकोनाकडे आणखी एक पाऊल टाकतो. ही गुंतवणूक केवळ औद्योगिक विकासाला चालना देणार नाही तर शाश्वत तंत्रज्ञान , स्वच्छ गतिशीलता आणि अक्षय ऊर्जा उपायांसह भारताच्या हरित संक्रमणाला देखील चालना देईल . माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारचे त्यांच्या दूरदर्शी दृष्टिकोन आणि उद्योग अनुकूल धोरणाबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत. ज्यामुळे अशा प्रकारचे परिवर्तनकारी उपक्रम शक्य झाले आहेत ”

समावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाच्या राज्याच्या दृषटिकोनाशी सुसंगत, गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राचे स्थान एक सर्वोच्य गंतव्यस्थान म्हणून बळकट करण्यासाठी ही भागीदारी सज्ज आहे.

Exit mobile version