Ladki Bahin Yojana e-KYC : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळवण्यासाठी e-KYC बंधनकारक करण्यात आली आहे.
Mumbai : महायुतीला विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळवून देण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली होती. ही योजना राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून चालवली जाते. या विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी काल एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य शासन देत असल्याचं म्हणत सर्व लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असं आवाहन केलं आहे. त्यामुळं येत्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींना ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
दोन महिन्यात ई-केवायसी पूर्ण करावी लागणार mukhyamantri majhi ladki bahin yojana ekyc
आदिती तटकरे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटलं की,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांनी 18 सप्टेंबरपासून पुढील 2 महिन्यांच्या आत सदर e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.
आदिती तटकरे यांनी या पुढं म्हटलं की ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे, असं आदिती तटकरे म्हणाले.

Read More : https://aaplisatta.com/iphone-17-pro-max-price-in-india/
लाडकी बहीण योजनेची ई केवायसी कशी पूर्ण करायची?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना https://ladakibahin.maharashtra.gov.in यावेबसाईटला भेट देऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
स्टेप 1: प्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या https://ladakibahin.maharashtra.gov.in/ वेबसाईटला भेट द्या.
स्टेप 2 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभर्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा या पर्यायावर क्लिक करा. यानंतर नवीन वेबपेज ओपन होईल.
स्टेप 3 : e-KYC – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पेजवर लाभार्थी आधार क्रमांक नोंदवावा लागेल. यानंतर कॅप्चा कोड नोंदवा, तो नोंदवताना चूक होणार नाही याची दक्षता घ्या. कॅप्चा कोड नोंदवल्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्या.
स्टेप 4 : आधार प्रमाणीकरण संमती मधील मजकूर वाचून मी सहमत आहे, या पर्यायावर क्लिक करा. यानंतर ओटीपी पाठवा हा पर्याय निवडा, यानंतर आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी मिळेल.
ईकेवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करायची याचा फ्लोचार्ट
Frequently Asked Quations
प्र.१ : लाडकी बहीण योजनेसाठी e-KYC का आवश्यक आहे?
उ. : लाभार्थ्यांची खरी ओळख निश्चित करून पारदर्शक पद्धतीने आर्थिक मदत पोहोचावी यासाठी e-KYC आवश्यक आहे.
प्र.२ : e-KYC करण्यासाठी अंतिम तारीख कोणती आहे?
उ. : लाभ सतत मिळावा यासाठी ठरवलेल्या वेळेत, साधारण दोन महिन्यांच्या आत e-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे.
प्र.३ : या योजनेत लाभ किती मिळतो?
उ. : पात्र महिलेला दर महिन्याला ₹1,500 थेट बँक खात्यात (DBT द्वारे) जमा केले जातात.
प्र.४ : e-KYC करताना कोणती कागदपत्रे लागतात?
उ. :
आधार कार्ड
निवास प्रमाणपत्र / राशन कार्ड / मतदार ओळखपत्र
उत्पन्न प्रमाणपत्र (गरजेनुसार)
विवाह प्रमाणपत्र (लागू असल्यास)
आधार लिंक असलेले बँक खाते तपशील
पासपोर्ट साईज फोटो व स्वघोषणापत्र
प्र.५ : e-KYC ऑनलाइन कोठे करावे?
उ. : e-KYC प्रक्रिया केवळ अधिकृत सरकारी संकेतस्थळावरच करावी. खोट्या संकेतस्थळांपासून सावध रहा.
प्र.६ : वेळेत e-KYC न केल्यास काय होईल?
उ. : वेळेत e-KYC न केल्यास पुढील लाभाची रक्कम थांबू शकते.
प्र.७ : e-KYC किती वेळा करावी लागेल?
उ. : e-KYC दरवर्षी एकदा, विशेषत: जून महिन्यात करणे बंधनकारक आहे.
प्र.८ : या योजनेसाठी कोण पात्र आहेत?
उ. :
महाराष्ट्रातील रहिवासी महिला
वय 21 ते 65 वर्षांदरम्यान
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपर्यंत
आधार लिंक असलेले बँक खाते
कुटुंबात कुणी सरकारी नोकरीत नसणे
प्र.९ : e-KYC पूर्ण झाल्याची खात्री कशी करावी?
उ. : प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर संकेतस्थळावर पुष्टी संदेश दिसेल किंवा नोंदणीकृत मोबाईलवर SMS येईल.
प्र.१० : e-KYC करताना अडचण आल्यास काय करावे?
उ. : जवळच्या महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अधिकृत हेल्पलाइनवर मदत घ्यावी.
Read More : https://aaplisatta.com/gst-new-slab-update-2025/
धन्यवाद वाचक मित्रानो आपली सत्ता ला भेट दिल्या बद्धल , अश्याच नवं – नवीन बातम्या पाहण्यासाठी आणि वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आपली सत्ता ला SUBSCRIBE करा व बेल icon वरती क्लिक करा आणि आमच्या शी जोडलेले राहा .
धन्यवाद…