रणवीर अल्लाबदिया याचे आई वडिलांच्या च्या शारीरक संबंधा विषयी अश्लील विधान ? जाणून घ्या सविस्तर | Ranveer Allabhbadia vulgar comment on Parents’ Sexual relationship

Indias Got Latent |Ranveer Allabhbadia vulgar comment ,यूट्यूबर रणवीर अलाहबादियाने पालकांबद्दल आक्षेपार्ह प्रश्न विचारल्यामुळे नवा वाद निर्माण झाला असून त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
“Ranveer Allabadia’s obscene statement about parents’ physical relationship| रणवीर अल्लाबदिया याचे आई वडिलांच्या च्या शारीरक संबंधा विषयी अश्लील विधान “
कॉमेडियन समय रैना याचा शो ‘इंडियाज गॉट लेटेंट’ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या शोमध्ये युट्युबर रणवीर अलाहबादिया याने विचारलेल्या प्रश्नावरुन वाद निर्माण झाला आहे. रणवीर अलाहबादिया याने स्पर्धकाला पालकांबद्दल आर्क्षेपार्ह प्रश्न विचारला, यानंचर सोशल मीडियावर एकच खळबळ माजली आहे. रणवीरने स्पर्धकाला विचारलं होतं की, कुणालाच्या पालकांना दररोज इंटिमेट होताना पाहायला आवडेल की, त्यांना साथ द्यायला आवडेल. रणवीरच्या या प्रश्नावरुन मोठी कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण झाली आहे. रणवीरचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्याच्यावर निशाणा साधण्यासा सुरुवात केली आहे.
रणवीर अलाहाबादिच्या फालतू प्रश्नावर नेटकरी भडकले
समय रैनाचा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा शो नेहमीच चर्चेत असतो. शो सुरु झाल्यापासून आतापर्यंत अनेक वादही निर्माण झाले आहेत. आता पुन्हा एकदा यामुळे नवा वाद उफाळून आला आहे. यूट्यूबर आशिष चंचलानी, अपूर्वा मुखिजा आणि रणवीर अलाहबादिया यासारखे सेलिब्रिटी शोच्या नवीन भागांमध्ये सामील झाले होते. या भागात रणवीर अलाहबादियाने एक प्रश्न विचारला, ज्यासाठी त्याला सोशल मीडियावर युजर्सनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
Parent’s sex life subject of joke? |पालकांचं लैंगिक आयुष्य विनोदाचा विषय?
सध्या विनोद फक्त अश्लीलतेबाबत मर्यादित आहे का, असाही प्रश्न उपस्थित झाले आहेत. फक्त प्रेक्षकांचे मनोरंजन करणे आणि व्ह्यूज मिळवणे हे ध्येय आहे की, काही नैतिक मर्यादा देखील असायला हव्यात? या वादामुळे भारतात कंटेंट क्रिएटर्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची जबाबदारी कुठे आहे याबद्दल पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
India’s Got Latent and Controversy|इंडियाज गॉट लेटेंट आणि वाद
‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा कॉमेडियन समय रैनाचा शो अनेकदा वादात सापडला आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणला ट्रोल करणं, अरुणाचल प्रदेशातील लोकांबद्दल विनोद अशा अनेक कारणांमुळे हा शो चर्चेत आला आहे. हा शो कॉमेडीच्या नावाखाली अश्लीलता वाढवत असल्याचं म्हणत आता नेटकऱ्यांनी यावर निशाणा साधला आहे. हा शो वल्गर टीप्पणी करत प्रसिद्धी मिळत असल्याचंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. पालकांचं लैंगिक आयुष्य कॉमेडीचा विषय कसा असू शकतो, असा सवालही नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. ‘बिअर बायसेप्स’ यूट्यूबर रणवीर अलाहबादियाच्या वक्तव्यावरुनही नेटकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे.
Reactions of netizens and other actors on the controversial issue|नेटकऱ्यांच्या व इतर अभिनेत्यांच्या यावर वादग्रस्त मुद्द्यावर प्रतिक्रिया :
रणवीर अलाहाबादियाच्या वादग्रस्त विधानामुळे अनेक सेलिब्रेटींचा शोमध्ये येण्यास नकार, सर्वात आधी या कलाकाराने फिरवली पाठ
मुंबई- सध्या रणवीर अलाहबादिया हा युट्युबर सध्या चांगलाच वादात सापडला आहे. इंडिया गॉट लेटेंट या शोमध्ये त्याने आईवडिलांवरुन आक्षेपार्ह विधान केले. त्यावरुन त्याच्यावर बरीच टीका होत आहे. सध्या त्याचे करिअर धोक्यात आल्याचे पाहायला मिळते. रणवीर मोठमोठ्या सेलिब्रेटींना त्याच्या शोमध्ये बोलवतो. पण आता त्याच्या एका चुकीमुळे बऱ्याच सेलिब्रेटींनी त्याच्या शोमध्ये येण्यास नकार दिला आहे.
ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांनी नुकतेच समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया यांच्या एका वादग्रस्त व्हिडिओवर आपले मत मांडले आहे. आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले की, ज्यांना या प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार आहे त्यांनी निश्चितच तसे करावे. पूर्वी, अश्लील कंटेंट ओटीटीचा भाग होता आणि आता तो अशा कॉमेडी शोपर्यंतही पोहोचला आहे, अन्नू कपूर पुढे म्हणाले, “ओटीटीमध्ये काम करणारे लोक तेच लोक आहेत जे टेलिव्हिजनमध्ये प्रतिबंधित होते. त्यांना प्रेक्षकांना काय हवे आहे हे चांगले माहिती आहे. जर तुम्हाला अश्लीलता हवी असेल तर ते तुम्हाला ती देण्यासाठी तयार आहेत. हे सर्व मागणी आणि पुरवठ्याबद्दल आहे. असे एक टक्काही लोक नसतील ज्यांना असा कंटेंट आवडत नाही.”
याशिवाय, गायक बी प्राकनेही रणवीरसोबतचा त्याचा पॉडकास्ट रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये त्याने आपला निर्णय स्पष्ट सांगितला. बी प्राकने खुलासा केला, “रणवीर, तू सनातन धर्माचा प्रचार करतोस, तू अध्यात्माबद्दल बोलतोस, तुझ्या शोमध्ये मोठमोठी नावे येतात आणि तुझी ही मानसिकता? मी तुम्हा सर्वांना विनंती करतो. जर आपण हे आता थांबवले नाही तर आपल्या मुलांचे भविष्य धोक्यात आहे.”
याआधी विनोदी कलाकार सुनील पाल यांनीही समय रैना आणि रणवीरवर टीका केली होती. आयएएनएसशी बोलताना सुनील पाल म्हणाले, “त्यांना स्टँड-अप कॉमेडियन म्हणू नका. असे करणे खऱ्या स्टँड-अप कॉमेडीचा अपमान होईल. ते अशिक्षित लोक आहेत त्यांना दहशतवाद्यांशी वागवले पाहिजे.”
तो म्हणाला, “आपले तरुण प्रतिष्ठित कुटुंबातील जबाबदार आणि सुसंस्कृत व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण, या तथाकथित विनोदी कलाकारांना सार्वजनिक व्यासपीठांवर आमंत्रित केले जाते जिथे ते अश्लीलता आणि आक्षेपार्ह भाषा वापरतात आणि त्याची विडंबना अशी की या कार्यक्रमांचे आयोजक सुशिक्षित लोक असतात. तेही अश्लीलतेला प्रोत्साहन देत आहेत.”
Reaction of Chief Minister Devendra Fadnavis|मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
रणवीर अलाहाबादियाच्या प्रश्नामुळे भारताची सर्जनशील अर्थव्यवस्था कोणत्या दिशेने जात आहे, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “फ्रीडम ऑफ स्पीच सगळ्यांनाच आहे. एखाद्याला दुखावण्यात कुठलंही स्वातंत्र्य नाही, मात्र अभिव्यक्तीलाही काही मर्यादा आहेत. आपण समाजात अश्लीलतेचे काही नियम लावले आहेत.”
Who is Ranveer Allabadia and how much is his net worth? |कोण आहे रणवीर अल्लाबदिया आणि किती आहे त्याची संप्पत्ती ?
प्रसिद्ध युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर इलाहाबादिया त्याच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आला आहे. रणवीर इलाहाबादिया समय रैनाच्या इंडियाज गॉट टॅलेंट शोमध्ये सामील झाला. त्यावेळी त्यानं एका स्पर्धकाला एक प्रश्न विचारला. या प्रश्नामुळं सोशल मीडियावर रणवीरवर बरीच टीका होत आहे. रणवीर इलाहाबादियाला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. रणवीर इलाहाबादियाने बॉलिवूड, हॉलिवूड स्टार, ज्योतिषी इत्यादी विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. रणवीर नेहमीच त्याच्या पॉडकास्ट, स्टायलिश लूक आणि फिटनेसमुळे चर्चेत असतो. चला जाणून घेऊया कोण आहे रणवीर इलाहाबादिया, त्याची जीवनशैली, करिअर आणि एकूण संपत्ती. णवीर इलाहाबादियाचा जन्म 2 जून 1993 रोजी मुंबईत झाला. त्याने मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतले. 2015 मध्ये द्वारकादास जीवनलाल संघवी अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये बी.टेक पूर्ण केले. रणवीर हा बियरबायसेप्स या नावानेही प्रसिद्ध आहे. वयाच्या 22 व्या वर्षी कारकिर्दीला सुरुवात करून त्याने YouTuber आणि पॉडकास्टर म्हणून स्वतःचे नाव कमावले. तो मोंक एंटरटेनमेंटचा सह-संस्थापक देखील आहे. इलाहाबादिया सात यूट्यूब चॅनेल चालवतो. या चॅनलचे 1.2 कोटींहून अधिक सबस्क्राइबर आहेत.
रिपोर्ट्सनुसार रणवीर इलाहाबादिया यूट्यूब आणि पॉडकास्टमधून दरमहा सुमारे 35 लाख रुपये कमावतो. त्याच्याकडे उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत ज्यात YouTube जाहिराती, रॉयल्टी, ब्रँड प्रायोजकत्व यांचा समावेश आहे. याशिवाय रणवीर ब्रँड प्रमोशन आणि जाहिरातींमधूनही भरपूर कमाई करतो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार 2024 पर्यंत रणवीर इलाहाबादियाची एकूण संपत्ती अंदाजे 60 कोटी रुपये आहे. त्याच्याकडे फक्त एकच कार आहे, स्कोडा कोडियाक, ज्याची किंमत सुमारे 34 लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.
‘आप सिख हैं..ये शोभा देता है आपको?’
सिंगर बी प्राक ने साधा कॉमेडियन महीप सिंह पर निशाना.#bpraak । #maheepsingh । #indiasgottalent pic.twitter.com/pps2cC5CZf
— NDTV India (@ndtvindia) February 10, 2025
अधिक वाचा: https://aaplisatta.com/who-will-be-the-next-prime-minister-of-india/
धन्यवाद वाचक मित्रानो आपली सत्ता ला भेट दिल्या बद्धल , अश्याच नवं – नवीन बातम्या पाहण्यासाठी आणि वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आपली सत्ता ला SUBSCRIBE करा आणि आमच्या शी जोडलेले राहा .
धन्यवाद…