
What causes kidney failure and what is its solution | किडनी खराब कशामुळे होते व त्यावरील उपाय काय आहेत जाणून घ्या नाहीतर यावरील दुर्लक्ष तुमच्या जीवावर भारी पडेल…..

मानवी शरीरातील किडनी हा अवयव अति महत्वाचा आणि प्रमुख आहे, त्या शिवाय मानवी जीवन आपण जगूच नाही शकत . त्यासाठी किडनीची निघा राखणे अति आवश्यक आहे , व किडनीची निघा कशी राखावी आणि त्या वरील लक्ष्य देण्याच्या उपाययोजना आपण आज माहिती करून घेणार आहोत , किडनी हा अवयव मानवी शरीरातील रक्त शुद्ध करून विषारी पदार्थ बाहेर टाकतो.
किडनी खराब असल्याची लक्षणे हि सुरुवातीला सौम्य असू शकतात त्यामुळे ती लक्षणे आपल्या सहसा लक्षत येत नाहीत . त्यातच त्यावर दुर्लक्ष्य झाल्यावर आणि वेळेवर योग्य उपचार न झाल्यास गंभीर समस्या उदभवू शकतात .त्यामळे किडनी खराब झाल्याची लक्षणे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहेत . व ती लक्षणे कोण कोणती आहेत ती आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊया …….

किडनी खराब असल्याची प्रमुख लक्षणे – Major symptoms of kidney failure
१ . लघवी ला फेस येणे आणि लघवीचा रंग हा गडद होणे
* वारंवार लघवी अति प्रमाणात करणे किंवा लघवी ला जाण्याचे प्रमाण कमी होणे
* लघवी करताना रक्त येणे
२. शरीरावरील इतर अवयवावर सूज येणे
* हात, पाय, चेहरा किंवा डोळ्यांच्या खाली सूज येणे
* शरीरात पाणी साचल्यामुळे वजन अचानक वाढणे
३. शरीराला नेहमी थकवा आणि अशक्तपणा वाटणे
* किडनी आपले काम नियमितपणे न केल्यामुळे शरीरात टॉक्सिन जमा होतात आणि त्यामुळे शरीराला थकवा येतो
* शरीरात रक्ताचा स्थर कमी होणे व त्यामुळे शरीरात अशक्तपणा जाणवणे
४ . भूक ना लागणे आणि जेवणाची अनियमितता आणि जेवनाबद्धल अउत्सुकता वाटणे
– शरीरातील पचन क्रियेत अडथडा होऊन खाण्याची इच्छा कमी होणे
– सतत उलटी होन्याची शक्यता किंवा मळमळ होणे
५. किडनी खराब असल्याने त्वचे वर परिणाम किंवा त्वचेला सतत खाज किंवा खरूज येणे
– त्वचेला कोरडेपणा , खाज किंवा चट्टे पडणे
– शरीरातील विषारी घटक बाहेर न टाकल्याने त्वचेवर परिणाम होतो
६. किडनी खराब असल्याने मानवी शरीराला श्वास घेण्यास त्रास होतो
– शरीरात पाणी साचल्याने फुपुसंवर दडपण येते व श्वास घेणास अडथडा निर्माण होतो
– मुख्यतः दम लागतो त्याच प्रमुख कारण रक्तातील आक्सिजन ची कमी होणे आहे.
७. उच्य रक्तदाब
– किडनी आपले कार्य नियमित पणे न केल्याने रक्तदाब वाढतो आणि त्याचा परिणाम हृदयावर अतिरिक्त ताण टाकतो

किडनी खराब होऊ नये म्हणून महत्वाच्या उपाययोजना व उपाय – Important measures and solutions to prevent kidney damage
१. संतुलित आहार घ्या आणि आपल्याआहारात नियमित प्रमाण घ्या
– आहारात मिठाचे प्रमाण कमी किंवा मर्यादित ठेवा
– कड धान्य, फळे आणि पाले भाज्या खा जेणे करून शरीरात प्रथिने तयार होतील
– सोडियम, पोटॅशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण नियंत्रित असलेला आहार घ्या.
२. नियमित व्यायाम करा
– दररोज किमान ३०-४५ मिनटे योगासने ,चालणे किंवा सायकलिंग करा
– रक्तदाब आणि साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी शारीरिक सक्रियता हालचाल आहे.
३. नियमित पाणी प्या
– दररोज नियमित ८-१० ग्लास पाणी प्या जेणे करून रक्त स्वच्छ होईल आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतील
– अधिक पाणी पपिल्याने किडनीतील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते
४. धूम्रपान आणि मद्यपान टाळा
– धूम्रपान निकोटीन आणि अल्कोहॉल हानिकारक पदार्थ किडनीला नुकसान करतात.
५. औषधांचा मर्यादित वापर करा
– पेनकिलर किंवा इतर औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या.
– किडनीसाठी हानिकारक ठरणारी औषधे सहसा घेणे टाळा
– व कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या
६. नियमित वैद्यकीय तपासणी करा
– मधुमेह आणि रक्तदाब असल्यास नियमितपणे किडनीचे कार्य तपासून घ्या.
– क्रिएटिनिन आणि युरिया पातळी तपासणे आवश्यक आहे.