CHHAVA MOVIE REVIEW :- कसा आहे विकी कौशल चा छावा ? छावा चित्रपट पाहण्या आधी हा रेव्हिएव वाचा,
Chhava Movie Review : विकी कौशलने ‘छावा’ चित्रपटाची अनेक दिवसांपासून चर्चा होती. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा हा चित्रपट पाहायला जात असाल तर त्याआधी हा रिव्ह्यू एकदा नक्की वाचा.

CHHAAVA MOVIE CAST :-
1.विकी कौशल,
2.रेशमिका मंदाना,
3.अक्षय खन्ना,
4.अशुतुष राणा,
5.दिव्या दत्ता,
6.प्रदीप राम सिंग रावत,
7.संतोष जुईकर ,
8.नील भूपालां,
9.विनीत कमर सिंग,
10.डायना पेंटी….
जाणून घ्या कोण आहे विकी कौशल :-
विकी कौशल हा एक भारतीय अभिनेता आहे ज्याचा जन्म 16 मे 1988 रोजी मुंबई येथे झाला होता. तो मसान (2015) त्याने या चित्रपटापासून डेबीयू केला, त्या नंतर त्याने सर्जिकल स्ट्राईक, सरदार उधम, सॅम बहादूर आणि आता ‘छावा’ चित्रपटातून विकी कौशल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यावेळी तो छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपात पडद्यावर अवतरला आहे. ‘छावा’ मध्ये विकीची मेहनत स्पष्ट दिसून येते, त्याने संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी जीव ओतले आहेत. प्रचंड परिश्रम घेतले आहेत. काय आहे छावाचा रिव्हू? चित्रपट पाहायला जाण्याआधी हा रिव्ह्यू वाचायला हवाय.
विकीचे वडील शाम कौशल हे अक्शन डायरेक्टर आहेत , त्याचा धाकटा भाऊ सनी कौशल देखील एक अभिनेता आहे. विकीने मुंबईतील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेशालेय आणि महाविद्यालयीन काळात तो रंगभूमीवर काम करत होता, २०११ मध्ये त्यांनी लाल पेन्सिल या नाट्यनिर्मितीतून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली, त्यांनी गँग्स ऑफ वासेपूर (२०१२) मध्ये अनुराग कश्यप यांच्या सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली, त्यांनी २०२१ मध्ये अभिनेत्री कतरिना कैफशी लग्न केले.
Chhaava Review in Marathi:
अजय देवगनच्या भारदस्त आवाजात सिनेमाची सुरुवात होते. सिनेमाच्या पहिल्याच सीनमध्ये औरंगजेब म्हणजेच अक्षय खन्नाची एण्ट्री होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनाची वार्ता ऐकून औरंगजेब खूश होतो.
शेर नही रहा, लेकीन छावा अभी भी जंगल मै घुम रहा है” या डायलॉगने सुरु झालेल्या छावा चित्रपटाच्या ट्रेलरने अंगावर काटा आणला होता. चित्रपटाचा टीझर आणि त्यानंतर आलेल्या ट्रेलरनंतर अख्ख्या महाराष्ट्रासह देशाला सिनेमाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा होती. ट्रेलरमध्ये विकी कौशल आणि अक्षय खन्नाचे डायलॉग आणि अॅक्टिंगने प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. सिनेमाची कथा कशी असेल, त्याची मांडणी कशी असले, डायलॉग कसे असतील?
याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. चित्रपट आता प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे चित्रपट नेमका कसा आहे यावर एक नजर टाकुया. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर याने छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास रुपेरी पडद्यावर उतरवण्याचं शिवधनुष्य हाती घेतलं होतं. छत्रपती संभाजी महाराज जगाला कळावे हा प्रामाणिक हेतू दिग्दर्शकाचा होता.
मात्र सिनेमा रिलीज झाल्यानंतर असं दिसतंय की विकी कौशल, रश्मिका मंदानासह अनेक कलाकार ऐतिहासिक कलाकृती सादर करताना अभिनयात काहीसे कमी पडले. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल आणि महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत रश्मिका मंदाना दिसत आहे. तर औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना आहे.
सिनेमाची सुरुवात :-
अजय देवगनच्या भारदस्त आवाजात सिनेमाची सुरुवात होते. सिनेमाच्या पहिल्याच सीनमध्ये औरंगजेब म्हणजेच अक्षय खन्नाची एण्ट्री होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनाची वार्ता ऐकून औरंगजेब खूश होतो. औरंगजेबाला वाटतं की मराठा साम्राज्य आता संपलं आणि त्यावर कब्जा करणं सोपं होईल. मात्र औरंगजेबाच्या स्वप्नांचा क्षणात चुराडा करत छत्रपती संभाजी महाराज बुरहानपूर आक्रमण करत मुघलांच्या सैन्याला धुळ चारतात. ट्रेलरमध्ये हाच सीन दाखवण्यात आला होता. संभाजी महाराजांच्या या आक्रमणानंतर औरंगजेबाचा तिळपापड होतो आणि तो संतापून मराठा साम्राज्य नष्ट करण्याची शपथ घेतो. सिनेमाच्या सुरुवातीलाचा हा मोठा सीन आहे.
गाजलेले डालोग:-
सिनेमा जसा पुढे सरकतो, तसं सिनेमावरची पकड काहीशी सुटताना दिसत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट म्हणून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा त्याकडून होत्या. मात्र सिनेमातील डायलॉग कुठेतरी मार खाताना दिसले. महाराजांचा इतिहास उभा करताना प्रत्येक डायलॉगवर टाळ्या पडतील,अशी अपेक्षा होती. मात्र विकी कौशलचा आवाज आणि डायलॉग डिलिव्हरी यामुळे प्रेक्षकांमध्ये तो जोश निर्माण झाला नाही.
Chhava Movie Review By Public – छावा चित्रपटाचे सार्वजनिक पुनरावलोकन
या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती दिसून येत आहे. नेटकऱ्यांकडून या चित्रपटाचं कौतूक होताना दिसतय. अंगावर शहारे आणणारा चित्रपट असल्य प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. एका प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देत, चित्रपट फार आवडल्याचं म्हटलं आहे. तर एका चाहत्याने विकीच्या अभिनयाचं कौतूक करत ‘विकी तु खरंच छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य जगलास’ असं म्हटलं आहे.
तर एका चाहत्यांने प्रतिक्रिया देत ‘छावातील क्लायमॅक्स तुम्हाला स्तब्ध आणि आवक करेल’ असं म्हटलं आहे. चित्रपटात लोकांकडून जयघोषही करण्यात आला. सोशल मीडियावर हाऊसफुल झालेल्या शोचे व्हिडिओ प्रेक्षकांनी शेअर केले आहे. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोषही करण्यात आला. या चित्रपटात अक्षय खन्ना याने औरंगजेबाची भूमिका साकारली होती. दरम्यान अक्षय खन्नाच्या अभिनयाला प्रेक्षकांनी पसंती दाखवली आहे. त्याच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी कौतूक केलं आहे.
CHHAVA MOVIE Big Twist- मोठा ट्विस्ट :-
छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सिनेमात कोणीही साकारत नाहीये. याजागी बॅकग्राऊंड व्हॉइस ओव्हर देऊन महाराज शंभूराजेंना वेळोवेळी कसे मार्गदर्शन करतात हे पाहायला मिळतं. ‘छावा’चा पहिला भाग काहीसा संथगतीने जातो. तर, दुसऱ्या भागात म्हणजेच मध्यातरानंतर वेगाने हालचाली होतात.
शेवटचा अर्धा तास प्रत्येकाला नि:शब्द करून टाकतो. ‘छावा’ कादंबरीत जसा आहे अगदी तसाच क्लायमॅक्स प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळतो… महाराजांना औरंगजेबाने दिलेला शारीरिक त्रास, तरीही शेवटपर्यंत धर्मासाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी लढलेले महाराज या गोष्टी दिग्दर्शकाने अतिशय भावनिकदृष्ट्या मांडल्या आहेत.
कुठेही काहीच खटकत नाही… फक्त तो छळ पाहताना अंगावर शहारा अन् डोळ्यात पाणी जरूर येईल. महाराजांचे शेवटचे क्षण आणि येसूबाईंनी तेवढ्याच खंबीरपणे घेतलेले निर्णय याची जोडणी क्लायमॅक्सला अगदी उत्तमप्रकारे केलेली दिसते. शेवटी शंभूराजेंचा एवढा छळ करून औरंजेबाच्या हाती येते ती फक्त हतबलता
Katrina Kaif (कतरीना कैफ ची प्रतिक्रिया) :-
छत्रपती संभाजी महाराजांची गाथा अतिशय जिवंतपणाने मांडण्यात आली आहे. सिनेमा पाहून मी थक्क झाले. चित्रपटामुळे माझ्यावर जो प्रभाव पडलाय तो मी शब्दात नाही सांगू शकत. सिनेमातल्या सगळ्याच कलाकारांनी अभूतपूर्व काम केलं आहे. विकी, तू तर उत्तम आहेसच पण तु जेव्हा पडद्यावर येतोस तेव्हा जिवंतपणा आणतोस. तुझं काम पाहून खूप छान वाटलं.
अधिक वाचा : https://aaplisatta.com/10-richest-actors-in-india/