
Delhi Railway Station Stampede – दिल्ली रेल्वे स्टेशन वरती झाली मोठी घटना चेंगराचेंगरीत झाला १८ जणांचा मृत्यू …..
दिल्ली : शनिवारी दिल्ली रेल्वे स्टेशन वरती अत्यंत वाईट घटना घडली आहे , व यात १८ जणांचा मृत्यू झाला तर २० हुन अधिक जण जखमी झालेले आहेत .
नेमकं काय घडलं व या घटनेला काय कारणीभूत आहे हा देखील मनाला झटका देणारा प्रश्न आहे .. व यात चूक कोणाची आहे आणि प्रशासन यासाठी काय निर्णय घेणार आहे जेणे करून भविष्यात अश्या घटना झाल्या नाही पाहिजेत…
दिल्ली रेल्वे स्टेशन वरती झाली सर्व घटना सर्विस्तर वाचा – Read all the incidents that happened above Delhi Railway Station in detail
शनिवारी (१५ फेब्रुवारी ) रोजी दिल्ली रेल्वे स्टेशन वरती प्रयागराज येतील महा कुंभ मेळाव्यात शाही स्नान करण्यासाठी प्रवाशी खूप मोट्या संख्येने आलेले होते ,
या साठी दिल्ली रेल्वे स्टेशन वरून प्रयागराज कुंभ मेळाव्याच्या निमित्ताने २ विशेष गाड्या चालवल्या जात आहेत व या दरम्यान या मध्ये चढण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी आलेले होते,
यामुळे दिल्ली रेल्वे स्टेशन फ्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १६ वरती काळ रात्री ८ ते ८:३० दरम्यान चेंगरा- चेंगरी झाली या या घटनेत मनात भक्ती भाव घेऊन आलेले १८ प्रवासी मरण पावले व २० हून अधिक प्रवासी जखमी झालेले आहेत.. मृत्यू झालेल्या प्रवासींमध्ये १४ महिला व मुले आहेत व ४ पुरुष आहेत . हि अत्यंत दुर्दैवी घटना आहे …
रेल्वे स्थानकावर अचानक प्लॅटफॉर्म बदलण्याची घोषणा करण्यात आली, ज्यामुळे लोक एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर धावले. तसेच मोठ्या संख्येने लोकांकडे जनरल तिकिटे होती. व यासारख्या अनेक घटना पूर्वी देखील झालेल्या आहेत .. याच्यातून प्रशासनाने व जनतेने मिळून काही उपाययोजना केल्या पाहिजेत जेणे करून भविष्यात अश्या घटना घडणार नाहीत .

दिल्ली रेल्वे स्टेशन वरील चेंगराचेंगरीत भयंकर प्रकार देखील घडला आहे – A stampede at the Delhi railway station has also witnessed a horrific incident
या घटने दरम्यान असे दिसून आले कि चेंगरा चेंगरी झल्यानंतर काही चोरांनी याचा फायदा घेतला व गर्दी मध्ये प्रवाशांच्या खिशावर चाकू व ब्लेड गर्दीमध्ये फिरवणार आले ,त्यात अनेक जणांना जखमा झालेल्या आहेत व अधिक प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले .व यातूनच अधिक प्रमाणात चेंगरा – चेंगरी झाली व या घटनेचा परिणाम अधिक गंभीर झाला व लोकांना आपले प्राण गमवावे लागलेत,
रेल्वे पोलिस उपायुक्त यांनी वृत्त संस्थांना सांगितले की, जेव्हा प्रयागराज एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर उभी होती, तेव्हा तिथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस उशिराने धावत होत्या आणि या गाड्यांमधील प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक 12, 13 आणि 14 वर देखील उपस्थित होते.
रेल्वे तिकीट काउंटर वरती दर तासाला 1500 जनरल तिकिटे विकली होती, त्यामुळे स्टेशनवर गर्दी वाढली त्यातच प्लॅटफॉर्म बदलल्याची घोषणा झाली, आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली
प्लॅटफॉर्म बदलल्याची घोषणा झाल्यानंतर स्टेशनवरील प्रवासी एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने निघाले. यादरम्यान चेंगराचेंगरी झाली. प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 16 दरम्यान एस्केलेटरजवळ चेंगराचेंगरी झाली.
“या दरम्यान, संबंधित घटनेत मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर गंभीर जखमींना अडीच लाख आणि किरकोळ जखमींना 1 लाख रुपयांची मदत सरकार द्वारे जाहीर करण्यात आलेली आहे”

या घटनेतील मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या परिवाराने मीडिया ला अश्रुंचे अनावरण करत माहिती सांगितली – The family of the persons who died in this incident revealed the information to the media through tears…
“माजी बायको-मुलगी गेली…”
राजकुमार नावाच्या एका व्यक्तीने मीडियाशी बोलताना सांगितले की, तो बिहारमधील नवादा येथील रहिवासी आहे , तो त्याच्या घरी जाण्यासाठी स्टेशनवर पोहोचला होता. तो आपल्या पत्नी, मुलगी आणि मुलासोबत स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत असताना अचानक गोंधळ उडाला. या चेंगराचेंगरीत पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाला, तर मुलाला कसेबसे गर्दीतून खेचून बाहेर काढले. या घटनेनंतर राजकुमार यांची जगण्याची इच्छा नाही, पण मुलासाठी जगणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, कुंभमेळा असो वा नवी दिल्ली रेल्वे स्टेशन, सामान्य माणसाच्या जीवाला काहीच किंमत नाही. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव जबाबदारी घेणार की नाही? असा सवालही त्यांनी केला.
“मांझी कुटुंब भट्टीवर काम करायचे”
पटवा सराई गावात राहणारे राजकुमार मांझी पत्नी शांती देवी, मुलगी पूजा कुमारी आणि मुलासह हरियाणातील एका वीटभट्टीवर काम करायचे. ते दिल्लीहून नवादाला जाणारी ट्रेन पकडण्याच्या तयारीत असताना अचानक स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली, ज्यात आई आणि मुलीला आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या गावात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घर वाटप आणि जॉब कार्डवर नावे जोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये आपले नाव जोडण्यासाठी राजकुमार मांझी हे कुटुंबासह घरी परतत होते. मात्र चेंगराचेंगरीत त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले.
अधिक वाचा : https://aaplisatta.com/ranveer-allabhbadia-vulgar-comment/
धन्यवाद वाचक मित्रानो आपली सत्ता ला भेट दिल्या बद्धल , अश्याच नवं – नवीन बातम्या पाहण्यासाठी आणि वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आपली सत्ता ला SUBSCRIBE करा आणि आमच्या शी जोडलेले राहा .
धन्यवाद…
A horrific tragedy unfolded last night at the New Delhi Railway Station, where a stampede claimed 18 lives, leaving many others injured.
The chaos erupted when a massive crowd rushed to board a special train to Prayagraj for the Mahakumbh Mela.
But now, a shocking… pic.twitter.com/7iEqLzX09i
— Mirror Now (@MirrorNow) February 16, 2025